महापुरुषांची बदनामी करणाऱ्या माध्यमांसाठी धोरण

 महापुरुषांची बदनामी करणाऱ्या माध्यमांसाठी धोरण

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डिजिटल माध्यमांवर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कायद्याच्या चौकटीत बसवून कठोरात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने, निश्चित धोरण ठरवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या संकेतस्थळांवर कायम स्वरुपी बंदी घालून तत्काळ कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना अमोल मिटकरी यांनी मांडली होती. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये अनेक पळवाटा आहेत त्यामुळे कायद्यातच कठोर बदल करण्यासंदर्भात ही समिती शिफारस करेल असं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी इंडिक टेल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

ML/KA/SL

24 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *