पोलिसांनी अडवला मणिपूर दौऱ्यावरील राहुल गांधींचा ताफा

बिष्णूपूर- मणिपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : भारत जोडो यात्रेनंतर दीर्घकाळ राजकारणात फारसे न दिसलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आता पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन काम करताना दिसत आहेत.काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी ते मणिपूरमध्ये पोहोचले आहेत. ते इम्फाल एअरपोर्टवरुन बाय रोड चुराचांदपूर जाण्यासाठी निघाले होते. परंतु विष्णूपूरमध्ये पोलिसांनी राहुल गांधी यांचा ताफा अडवला.
पोलिसांच्या या भूमिकेविरोधात काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. पोलिसांच्या आग्रहामुळे राहुल गांधी पुन्हा इम्फालकडे परतले आहेत. आता ते इम्फाल एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरने पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
मणिपूर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या ताफ्याला विष्णूपूर येथे रोखलं होतं. पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यासाठी परवानगी दिली नाही.विष्णूपूरमध्ये तासनतास अडकल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी चुरचंदपूरला जाण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले. त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी अडवले. इम्फाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या बिष्णुपूर येथे त्यांना थांबावे लागले.
पोलिसांनी हल्ल्याच्या भीतीने त्यांचा ताफा थांबवल्याचे सांगितले. विमानतळावरील एका सूत्राने सांगितले की, “राहुल गांधी यांनी चुरचंदपूरला जाण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत उच्च पोलीस आणि प्रशासन अधिकारी होते.”
SL/KA/SL
29 June 2023