उपवनमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

 उपवनमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

ठाणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुसंस्कृत तोंडवळा असलेल्या ठाणे शहरात आता अमलीपदार्थांच्या अड्ड्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील प्रसिद्ध उपवन तलाव येथील एका हाॅटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर आज वर्तकनगर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हुक्का पार्लर चालविणाऱ्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे शहर तसेच विविध भागातून उपवन येथील तलावाकाठी तरुण-तरुणी फिरण्यासाठी येत असतात. या भागात अनेक मोठे हाॅटेल, उपाहारगृहे आहेत. उपवन तलावाजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर प्रवेशद्वाराजवळील एका हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे, वर्तकनग पोलीस ठाण्याचे कर्मचारी हुक्का पार्लरमध्ये गेले. हुक्का पार्लरसाठी लागणारे साहित्य आढळून आले. याप्रकरणात पोलिसांनी हुक्का पार्लरचे सर्व साहित्य जप्त केले. तसेच हुक्का पार्लरमधील व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ अंतर्गत कलम २१ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

SL/ML/SL14 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *