करमुसे प्रकरणात पुन्हा तपास करा , पोलिसांना आदेश
ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्यातील इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरणात पोलिसांनी येत्या तीन महिन्यांत पुन्हा तपास करावा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे करमुसे यांनी अशी मागणी केली होती.
संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असणाऱ्या आणि ठाण्यात राहणाऱ्या करमुसे यांना जितेंद्र आव्हाड मंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली होती.
त्याआधी आव्हाड यांच्याबाबत करमुसे यांनी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर केली होती , त्यामुळे ही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. या प्रकरणी फेर तपास करण्याची याचिका उच्च न्यायालयात फेटाळल्या नंतर सुप्रीम कोर्टात धाव करमुसे यांनी घेतली होती.
दरम्यान आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांनी न्यायलायात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रावर टीका केली असून आपल्याला गुंड ठरविले तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आरोप त्यात केल्याचे ते म्हणाले.Police ordered to re-investigate Karamuse case
ML/KA/PGB
24 Feb. 2023