जलपुनर्भरणासह पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्यात आले असून हे काम करताना पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देण्यात आला. भूजल पातळी वाढावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसह वृक्षारोपणदेखील करण्यात आले. या अंमलदार कक्षाचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, दीपक चौधरी, रवीकिरण कोंबडे, धनंजय जहुरकर, मनोज अडवाणी, संदीकादत्त मिश्रा, पद्मनाभन अय्यंगर, संजय व्यास, सुनील मंत्री, महेश प्यारपियानी, राजेश अग्रवाल, चेतन चौधरी, मनीष अग्रवाल, माजी नगरसेवक मनोज अहुजा यांचे सहकार्य लाभले. आर्किटेक मनोज पिट्रोदा यांचे मार्गदशन लाभले. यावेळी काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. Police initiative for environmental conservation including water recharge
ML/ML/PGB
27 Jun 2024