आंदोलक लाठीमारानंतर पोलीस अधीक्षक रजेवर
जालना दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीमार घटनेनंतर जिल्ह्यात आज अत्यंत जलदगतीने घडामोडी घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय काही पोलिस अधिकाऱ्यांच्या ही अन्यत्र बदली करण्यात आल्या आहेत.
तुषार दोषी त्यांच्या जागेवर तातडीने आयपीएस शैलेश बलकवडे यांना पाठविण्यात आले आहे. ते तात्काळ जालन्यात हजरही झाले असून,त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
बलकवडे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.त्यांनी गोंदिया, नागपूर ग्रामीण,कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. तसेच, त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे याही आयएएस अधिकारी आहेत.
याशिवाय अपर जिल्हादंडाधिकारी, केशव नेटके यांनी जालना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये अधिकाराचा वापर करून याद्वारे पाच (५) किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करीत असल्याचे आदेश काढले असून हा आदेश संपूर्ण जिल्हयासाठी उद्या ०४.०९.२०२३ रोजीचे ०६.०० वाजे पासून ते १७.०९.२०२३ रोजीचे २४.०० वाजेपावेतो अमलात राहील असे आदेश काढले आहेत.
ML/KA/PGB 3 Sep 2023