मानखुर्दमध्ये विषबाधा; मुलाचा मृत्यू

 मानखुर्दमध्ये विषबाधा; मुलाचा मृत्यू

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मानखुर्दमधील महाराष्ट्रनगर परिसरात रस्त्यावर तयार केलेला पिझ्झा बर्गर खाल्ल्यामुळे सोमवारी रात्री १० ते १५ जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी प्रथमेश भोकसे (१९) या मुलाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र नगरमधील हनुमान चाळीजवळ एका फेरीवाल्याकडील पिझ्झा बर्गर सोमवारी काही जणांनी खाल्ले होते.

अर्धा तासानंतर या सर्वांना मळमळणे, उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. काहींना खासगी तसेच पालिकेच्या शताब्दी, सायन, केईएम रुग्णालयात दाखल केले. यापैकी अनेकांना रात्री घरी पाठविण्यात आले. प्रथमेश भोकसे या मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने केईएममध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. सुमारे ४० ते ५० जणांना त्रास झाला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

SW/ML/SL

8 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *