पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बॅल्जियममध्ये अटक

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. सुमारे २ अब्ज डॉलर्सचा घोटाळा चॉक्सीने केला होता. त्यानंतर तो देशाबाहेर गेला. २०२१ च्या अखेरीस अँटिग्वामधून पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या. बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या. तो सध्या बेल्जियममध्ये तुरुंगात आहे.