पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच मुंबई कोस्टल रोड पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोस्टल रोड या महानगरी मुंबईच्या भविष्यकाळातील विकासासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकल्पाचे काम आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मांडला. 59954.75 कोटी रुपयांच्यां या अर्थसंकल्कात कोस्ट रोडसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमिटरचं लोकार्पण १९ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
अर्थसंकल्पात कोस्टल रोड प्रकल्पासाठी 2900 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर दहिसर – भाईंदर लिंक रोड (कोस्टल रोड शेवटचा टप्पा)220 कोटी, मुंबई कोस्टल रोड (उत्तर) वर्सोवा ते दहिसर 6 पॅकेज 1130 कोटी, गोरेगाव – मुलुंड लिंक रोड (GMLR) 1870 कोटी आणि सीवरेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट (STP) 4090 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील पहिल्या फेजच वरळी ते मरीन ड्राईव्ह ह्या पहिल्या फेजच्या १० किलोमिटरचं लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर १५ मे पर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची पालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे. गोरेगाव मुलुंड रोड टनलच्या कामाचे उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते होणार होणार आहे.
मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभागलेला आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार असली तीर हा मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे.
मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.
SL/KA/SL
2 Feb. 2024