कुवेतच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान मोदींचा गौरव
कुवेत सिटी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या हस्ते कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ प्रदान करण्यात आला आहे. कुवैत आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तब्बल ४३ वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानाने कुवेतला भेट दिली असून या भेटीत मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे.
कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भव्य स्वागत केले. कुवेतमधील ‘बायन’ पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
कुवैत आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये व्यापार आणि वाणिज्य हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात वाढ झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. व्यापार आणि वाणिज्य हे आमच्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. आमचे द्विपक्षीय संबंध सातत्याने वाढत आहेत. आमची ऊर्जा भागीदारी आमच्या द्विपक्षीय व्यापारात एक अद्वितीय मूल्य जोडते.