पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल तोडून केले UAE च्या अध्यक्षांचे स्वागत
नवी दिल्ली, दि. १९ : भारत आणि संयुक्त अरब अमिराती UAE यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना अधोरेखित करणारी एक महत्त्वपूर्ण घटना आज घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल मोडून स्वतः दिल्ली विमानतळावर जाऊन UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांचे स्वागत केले. साधारण दोन तासांच्या या अल्पकालीन दौऱ्याने जागतिक स्तरावर उत्सुकता निर्माण केली आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार, शेख जायद आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सहकार्य, ऊर्जा आणि जगाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोठा करार होऊ शकतो.
विमानतळावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन देत स्वागत केले. मोदी यांनी ट्विटरवर लिहिले, “मी माझ्या भावाला, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलो. त्यांचा दौरा भारत-यूएई मैत्रीच्या दृढतेचे प्रतीक आहे.”
या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सुरक्षितता, मध्यपूर्वेतील स्थैर्य आणि धोरणात्मक भागीदारी यावर चर्चा झाली. अल्पकालीन असला हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध आधीच मजबूत आहेत, परंतु या भेटीने दोन्ही देशांच्या नेतृत्वातील वैयक्तिक स्नेहभाव अधिक स्पष्ट झाला आहे.
UAE भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांमध्ये 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यापार होतो. यामध्ये UAE ने भारतातून 2 लाख कोटी रुपयांची आयात केली आहे. भारताला UAE सोबत वित्तीय तूट आहे. म्हणजे, भारत UAE मधून जास्त आयात करतो आणि कमी निर्यात करतो.
UAE ला भारताच्या प्रमुख निर्यातीमध्ये पेट्रोलियम उत्पादने, धातू, दगड, रत्ने आणि दागिने, खनिजे, अन्नपदार्थ जसे की धान्य, साखर, फळे आणि भाज्या, चहा, मांस आणि सीफूड, कापड, अभियांत्रिकी यंत्रसामग्री उत्पादने आणि रसायने यांचा समावेश आहे.
SL/ML/SL