पंतप्रधानांनी केले दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे उद्घाटन

 पंतप्रधानांनी केले दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे उद्घाटन

दौसा,दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्वात मोठ्या मुंबई -दिल्ली एक्सप्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यामुळे मुंबई -दिल्ली अंतर १२ तासात पार करता येईल.

पहिल्या टप्प्यातील 247 KM मार्ग खुला

दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस-वे ची लांबी 1385 किमी आहे. द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी 247 किमी आहे. यासोबतच पंतप्रधान येथे 247 किलोमीटर लांबीच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्प सुमारे 5,940 कोटींचा आहे.

12 हजार 150 कोटींत 246 KM लांबीचा एक्स्प्रेस-वे

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली-दौसा-लालसोट विभाग 246 किमी लांबीचा आहे, जो 12,150 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. हा भाग सुरू झाल्याने दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ 5 तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे. हा भाग सुरू झाल्याने संपूर्ण प्रदेशात आर्थिक विकासालाही वेग येईल. उद्घाटनानंतर रविवारीच हा एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या महामार्गावर 120 किमी वेगाने वाहने धावू लागतील.

SL/KA/SL

12 February 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *