युवा संमेलनासाठी पंतप्रधान नाशिकमध्ये

नाशिक, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील युवा संमेलनात मार्गदर्शन करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील केंद्रीय पथक तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साधू ग्राम मैदानाची पाहणी करून आढावा घेतला. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे.
जानेवारीत भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांशी निगडित विंगशी संबंधित संमेलन नाशिकमध्ये होत आहे. संमेलनात देश पातळीवरील निवडक सुमारे ८ ते १० हजार युवा कार्यकर्ते सहभागी होणार आहे. याच संमेलनातील सहभागी युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. पंतप्रधान नाशिकमध्ये येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
याचदरम्यान नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिराला ही ते भेट देणार असल्याचे सांगितले जाते आहे, मंदिर समितीच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
ML/KA/SL
29 Dec. 2023