त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनी घेतली प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्याची शपथ

 त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनी घेतली प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्याची शपथ

नाशिक, दि. ५ : आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधन श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांनी पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही, कापडी पिशव्याच वापरू, अशी शपथ त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात नागरिक, दुकानदार, भाविकांना देण्यात आली. जागतिक पर्यावरण दिन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि गोदावरी नदी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक पिशव्यांविरोधात जनजागृती दरम्यान ही शपथ घेण्यात आली.

या दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “समस्या से समाधान तक, मिटाएंगे प्लास्टिक’ या पथनाट्याद्वारे जनजागृती केली. भाविकांना कापडी पिशवी देऊन त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या घेण्यात आल्या. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, समितीचे निशिकांत पगारे, ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुगे, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी विजय जाधव या प्रबोधनात्मक कार्यक्रमात सहभागी झाले होते. दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्यांविरोधातील घोषणा फलक हाती घेत त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ प्रबोधन केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *