पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये शाहीर साबळेच्या नावाने संशोधन केंद्र

मुंबई, दि. १९ —
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन व अभ्यास करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातर्फे पु.ल. देशपांडे कला अकदामीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याला शाहीर साबळेंचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृती कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज दिली.
महाराष्ट्राला प्रयोगात्मक’ कलांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने अकृषी विद्यापीठातील प्रयोगात्मक कलांच्या विभागांकडून लोककलांचे सर्वंकष ध्वनिचित्र मुद्रण स्वरूपात केलेले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडे नाटक, लोककला, संगीत, नृत्य अशा विविध प्रयोगात्मक कलांची माहिती उपलब्ध आहे. पण त्याचे वर्गीकरण विश्लेषण व त्याच्यावर संशोधन होणे आवश्यक आहे.
ज्याचा उपयोग राज्यातील आणि राज्या बाहेरील पदवी, पदवीत्तोर व पीएचडी करणाऱ्या विदयार्थ्यांना अभ्यासासाठी होईल. त्यामुळे या विषयाबाबत आज सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विभागाची मंत्रालयात बैठक घेऊन घोषणा केली. तसेच या संशोधन केंद्राचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागाला दिले.
या बैठकीला सांस्कृतिक कला संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या विभागाचे सबंधति अधिकारी, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत बोलताना मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या कलांमध्ये महाराष्ट्राच्या जढणघडणीचे ऐतहासिक संदर्भ दडलेले आहेत.
त्यांचा उलगडा करुन संशोधन व अभ्यास होण्याची गरज आहे. शाहीरी, पोवाडा, जागरण, गोंधळ, तमाशा व वघनाट्य, नाटक, दशावतार, भारुड, नाटक, किर्तन अशा सगळयाच कलांना प्रचंड मोठी पंरपरा आहे. तसेच त्यांच्यामध्ये मानवाला जगण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जगामोर उलगडून दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी संशोधन व या कलांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून शासनाने स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या संशोधन केंद्राला योग्य नाव देण्याचा आम्ही जेव्हा विचार केला त्यावेळी समाजातील या क्षेत्रातील जाणकरांनी सूचविल्याप्रमाणे शाहिर साबळे यांच्या नावावर आम्ही शिक्का मोर्तब केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात शाहिरांचे मोठे योगदान होते त्यामधील अग्रणी जी नावे घेतली जातात त्यामध्ये पद्मश्री शाहिर कृष्णराव साबळे यांचे योगदान मोठे असून त्यांनी प्रयोगात्मक कलांच्या प्रचार आणि प्रसार कार्यात दिलेले योगदान लक्षात घेऊन या संशोधन केंद्राला त्यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती, मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली. ML/ML/MS