काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ आजच्या IPL सामन्यात खेळाडू बांधणार काळ्या पट्ट्या

काल काश्मीरमधील झालेल्या भीषण हल्ल्याच्या 27 पर्यटकांचा बळी गेला. याच्या निषेधार्थ आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या IPL सामन्यात सर्व खेळाडू आणि पंच काळ्या पट्ट्या घालून मैदानात प्रवेश करणार आहेत. तसेच या सामन्यादरम्यान मैदानावर कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा केला जाणार नाही. खेळ शांततेत खेळला जाईल. फटाके वाजवले जाणार नाहीत, तसेच चीअरलीडर्सकडून नृत्य केले जाणार नाही. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्यापूर्वी एक क्षण मौन पाळले जाईल.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अनेक क्रिकेटपटूंनी निषेध केला आहे. त्यांनी पोस्ट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लिहिले की, पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या भयानक हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांना संवेदना. या क्रूर कृत्याला न्याय मिळावा आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो.
सचिन तेंडुलकरने लिहिले की, हल्ल्यात प्रभावित कुटुंबे अकल्पनीय वेदनांमधून जात असतील. या परिस्थितीत भारत आणि जग त्यांच्यासोबत एकजूट आहे. सर्वांना न्याय मिळावा अशी आम्ही प्रार्थना करतो.