वालधुनी नदीत प्लास्टिकचा खच
कल्याण दि.12( एम एमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर शहराच्या मध्यमागातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीत प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि अन्य प्लास्टीक च्या वस्तुंचा खच जमा झाला असुन प्लास्टिक पिशव्याना बंदी असताना सुध्दा ऐवढ्या पिशव्या येतात कोठुन असा प्रश्न येथिल जल बिरादरीवाल्याने केला आहे.
उल्हासनगर शहरातुन वाहणारी वालधुनी नदी सध्या प्लास्टिक पिशव्यांच्या विळख्यात सापडली आहे . पुर्ण नदी ही प्लास्टिक पिशव्यानी व्यापली आहे . राज्यात प्लास्टिक ला बंदी असताना उल्हासनगर शहरात मात्र प्लास्टिक पिशव्याचे कारखाने बिनधास्त पणे सुरु आहेत . हे कारखाने वाले दलाला मार्फत महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना हप्ते देत देवुन आपला प्लास्टिक चा गोरख धंदा सुरु ठेवला आहे.
महापालिका अधिकारी व कर्मचारी हे फक्त दुकानदारावर धाड मारुन प्लास्टिक च्या वस्तु हस्तगत करतात . मात्र कारखानदार यांना मोकळे सोडतात. हाच प्लास्टिक चा व्यवसाय वालधुनी नदीच्या मुळावर उठला आहे . उल्हासनगर शहरात जवळपास १० ते १२ प्लास्टिक च्या पिशव्या तयार करण्याचे कारखाने आहेत.
महापालिका अधिकाऱ्याना हप्ते मिळत असल्याने हे कारखाने खुलेआम सुरु आहेत . तेव्हा याच प्लास्टिक च्या पिशव्याने वालधुनी नदी व्यापली आहे .पहलुमल कंपाऊड ते शांतीनगर पर्यंत या नदीत प्लास्टिक चा खच दिसुन येत आहे . तेव्हा शहरात सुरु असलेल्या प्लास्टिक च्या कारखान्यावर महापालिकेने कारवाई केली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे . कॅंप २ येथिल नेहरु चौक ते अमन टॉकिज रोडवर प्रत्येक दुकानात प्लास्टिक च्या पिशव्या आणि प्लास्टिक चे साहित्य खुले आम विक्री साठी ठेवले आहे . शहरात संपुर्ण प्लास्टिक बंदी करावी अशी मागणी होत आहे.
SW/KA/SL
12 May 2023