अथक फाउंडेशन कडून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह चे शतक पूर्ण

 अथक फाउंडेशन कडून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह चे शतक पूर्ण

मुंबई प्रतिनिधी : मुलुंड परिसरात जमा होणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध गेली नऊ वर्षे झुंज देणाऱ्या अथक फाउंडेशनने १०० वी प्लास्टिक कलेक्शन ड्राइव्ह मोहीम यशस्वी पणे पूर्ण करून कचरा विघटनाचे एक शतक पूर्ण करून स्वतःच्या नावे एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे . सदर उपक्रमाचे आयोजन मुलुंड पूर्व केळकर कॉलेज वी बी फडके रोड येथे करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेविका अनिता वैती, नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि डॉ. मेधा सोमय्या यांच्या उपस्थितीने उपक्रमाला ऊर्जितावस्था मिळाली होती.

अथक फाउंडेशनने आतापर्यंत २०० टनांहून अधिक प्लास्टिक–थर्माकोल पूर्णपणे लँडफिलपासून वाचवत पर्यावरण संवर्धनाची ठोस दिशा दिली आहे. २०० पेक्षा जास्त सोसायट्यांमध्ये राबवलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन, काच–ई-वेस्ट संकलन आणि शालेय जनजागृती उपक्रमांमुळे संस्था स्थानिक पातळीवर प्रभावी चळवळ उभी करण्यात यशस्वी ठरली आहे.

१०० व्या ड्राइव्हमध्ये अथक स्वयंसेवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्लास्टिक कचऱ्याचे लक्षणीय संकलन केले. परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही चळवळ आज इथपर्यंत पोहोचली आहे. शून्य कचरा शहर हे स्वप्न आता अधिक जवळ आले असल्याचे”अथक फाउंडेशनच्या अध्यक्ष अस्मिता गोखले यांनी म्हटल आहे.

प्लास्टिक संकलन मोहिमेत प्रामुख्याने एकदाच वापरल्या जाणाऱ्या (Single-use) प्लास्टिक वस्तू गोळा केल्या जातात. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, अन्नाचे डबे, कप, प्लेट्स, चमचे, स्ट्रॉ, पॅकेजिंग फिल्म्स आणि थर्माकोलचा समावेश होतो या वस्तू योग्य विल्हेवाटीसाठी गोळा केल्या जातात, ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो त्यानंतर संकलित कचरा कंटेनरने पुण्याला पाठवून पूर्णपणे नष्ट केला जातो.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *