साईसंस्थानकडून ४४ एकर क्षेत्रावर वृक्षारोपण

 साईसंस्थानकडून ४४ एकर क्षेत्रावर वृक्षारोपण

अहमदनगर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साईबाबांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश जपत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्‍थान विश्र्वस्त व्‍यवस्‍थेच्या वतीने मौजे रूई येथील सुमारे ४४ एकर क्षेत्रावर वृक्ष लागवडीचा आज श्रीगणेशा करण्यात आला. संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्‍या शुभहस्‍ते आंबा वृक्षाचे रोपण करून वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यामध्ये संस्थानच्या आय टी. आय. महाविद्यालयामधील विद्यार्थी, शिक्षक, संस्थान कर्मचारी यांची मोलाची मदत झाली. यापुढेही वृक्षारोपणाचा उपक्रम अविरत सुरू ठेवणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी सांगितले.
साई संस्थानची शिर्डी परिसरात विविध ठिकाणी पडिक जमीन आहे. या पडिक जमिनीवर संस्थानच्या वतीने  वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी प्रत्‍येकी किमान ५ झाडांचे रोपण करून, त्‍याचे संगोपन करण्याचा संकल्‍प केला आहे.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या मौजे रूई येथील क्षेत्रात सुरक्षिततेसाठी २००० बांबूच्या झाडांचे रोपण करण्यासह ३०० आंबा, चिंच, कडुनिंब आदी प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे, कार्यकारी अभियंता बी. डी. दाभाडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, डी. टी. उगले, प्रज्ञा महांडुळे, उद्यान विभाग प्रमुख अनिल भणगे, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ML/KA/SL

15 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *