वटसावित्री निमित्त पाच हजार झाडांचे रोपण
छ. संभाजीनगर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्राणवायूचे महत्व ओळखून सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे ग्रामस्थांनी वाट पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडासह दुर्मिळ 5 हजार रोपाचे केले रोपण केले आहे.
पर्यावरण संवर्धन हेतूने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिली देवराई निर्माण करण्यात येत आहे, यात 5000 दुर्मिळ आणि देशी प्रजातींची झाडे येथे लावण्यात आले आहे. प्रारंभी वट पौर्णिमाच्या मुहूर्तावर वृक्ष रोपणाचा कार्यरंभ करण्यात आला . संपूर्ण गावकरयांनी वृक्ष दिंडी काढून वडाचे आणि विविध झाडाचे महत्व विषद केले, या उपक्रमात वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्यांनी सहभाग घेऊन गावकऱ्यांना वृक्षारोपणाचा महत्व सांगितले.
देवराई ही पवित्र संकल्पना आहे. विविध 100 हून अधिक प्रजातींची रोपण येथे केले असून यानिमित्ताने गावातील प्रत्येक घराला 2 झाडे देण्यात आली . गावपरिसरातील माळरान,शेती परिसरात या वृक्षाचे रोपण करण्यात येत आहे. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ML/ML/SL
21 June 2024