पर्यावरण संतुलनासाठी 300 बहावा वृक्षांची लागवड

 पर्यावरण संतुलनासाठी 300 बहावा वृक्षांची लागवड

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अभिनेता अक्षय कुमार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते आज बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली .

मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम राबवित असते. या उपक्रम अंतर्गत हे वृक्षारोपण पार पडले. अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यांचे दिवंगत वडील हरी ओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या झाडांचे रोपण केले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. अभिनेता अक्षय कुमार यांनी खेरवाडी परिसरातील आपल्या निवासस्थानाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. सोमवारी प्रतिनिधीक स्वरुपात काही बहावा झाडांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेत बहावाची ३०० झाडे लावण्यात येणार आहेत.

ही वृक्षारोपण मोहीम मुंबईला हरित ठेवण्यासाठी राबविण्यात येत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यातून झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी ‘झाडांचा खड्डा स्वीकारा आणि निसर्गाचे पालक बना’ या मोहिमेत आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बप्पी लाहिरी, अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण, सोनू निगम, संग्राम सिंह, रणवीर शौरी आणि त्यांचा मुलगा हारून शौरी, रोहित शेट्टी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री तथा खासदार श्रीमती हेमा मालिनी, अभिनेत्री श्रीमती सोनाक्षी सिन्हा, श्रीमती आयेशा झुल्का आदींनी सहभाग नोंदविला आहे. Plantation of 300 Bahawa trees for environmental balance

ML/ML/PGB
24 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *