वर्षभरात ४७४ संयत्र उभारणीचे नियोजन

 वर्षभरात ४७४ संयत्र उभारणीचे नियोजन

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  घरगुती वापरासाठी प्रदुषण विरहित इंधन म्हणून उपयुक्त असलेल्या बायोगॅस संयत्र उभारणीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आखले आहे. वर्षभरात ४७४ संयत्र उभारणीचे नियोजन आखले असून त्यासाठी प्रवर्गनिहाय आकाराप्रमाणे ९ हजार ८०० ते ७० हजार ४०० रूपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला शासनाने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत २०२२-२०२३ या कालावधीत ४७४ बायोगॅस संयत्र उभारणीचे उद्दीष्ट दिले आहे. त्यात २ ते २५ घनमिटर बायोगॅसला अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गात एक घनमिटरसाठी ९ हजार ८०० तर २० ते २५ घनमिटर बायोगॅससाठी ५२ हजार ८०० अनुदान दिले जाणार आहे. तर अनुसुचित जाती व जमातीसाठी एक घनमिटरसाठी १७ हजार तर २० ते २५ घनमिटरसाठी ७० हजार ४०० अनुदान दिले जाणार आहे. संयत्राला शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त १ हजार ६०० रूपये अनुदान दिले जाणार आहे.

ML/KA/PGB
3 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *