मानवी हस्तक्षेप विरहित पथदर्शी जमीन मोजणी प्रकल्प
अहमदनगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात मानवी हस्तक्षेप विरहित जमीन मोजणीचा अद्ययावत पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. यामुळे अपुरे मनुष्यबळ आणि अपुरी मोजणी मशिनच्या कारणाने भूमी अभिलेखा कार्यालयाकडे रखडलेली जमीन मोजणीची कामे जलद गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
मानवी हस्तक्षेप विरहित जमीन मोजणी यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडून निविदा मागवण्यात आली होती. यानुसार मोनार्ट, शिदोरे आणि सिव्हील या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
या तीन कंपन्यांच्या सहाय्याने आता नगर जिल्ह्यात पथदर्शी स्वरूपात जमीन मोजणी केली जात आहे. अक्षांश आणि रेखांशासह ही मोजणी केली जात आहे. नगर जिल्ह्यातील प्रलंबित जमिन मोजणी प्रकरणे तीन महिन्यात मार्गी लागणे अपेक्षित आहे.
मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे जमीन मोजणीच्या कामात अचूकता येण्यास मदत होणार आहे.
SL/KA/SL
9 April 2023