मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका, पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली…

जालना दि २०:– जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका बसलाय. तालुक्यातील अनेक भागांत मागील 4 दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात पडलेत. 4 दिवसांपूर्वी घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले होते. 4 दिवस उलटूनही हे पाणी ओसरले नाहीये. त्यामुळे याचा फटका पिकांना बसला असून पिकं सडली आहेत. यामुळे या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. ML/ML/MS