पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवादांचे फोटो झाले उघड, ओळखही पटली

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत आता महत्त्वाची माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला आहे, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत. दरम्यान लोकांचा रोष वाढत असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी नागरिक करत आहेत.