उत्सवांमुळे फुलांना मोठी मागणी,आवक घटल्याने दर वधारले….
जालना दि २:– जालना बाजारात सण – उत्सवांमुळे फुलांना मोठी मागणी दिसून येत आहे. पण बाजारात आवक घटल्याने फुलांचे दर वधारल्याचे चित्र दिसून येत आहे. गणेशोत्सवानिमित्त जास्वंद, झेंडू, गुलाब, शेवंती, रजनीगंधा यांसारख्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, सध्या बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने फुलांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.ML/ML/MS