२०० मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असलेला हा फोन झाला लाँच

 २०० मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असलेला हा फोन झाला लाँच

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Honor कंपनीने आज भारतात आपला Honor 90 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच अल्ट्रा वाइड अँगलसह १२ मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे.

honor च्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिझोल्युशन हे १.५ के इतके आहे. तर याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनला Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC सपोर्ट येतो. ज्यात १२८ जीबी LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी इतके UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आपले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित OS ७.१ वर चालतो. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

या फोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासाठी यामध्ये ६६W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात फोन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS आणि USB टाइप-सी अशी फीचर्स यात मिळतात.

भारतात Honor 90 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये आहे. तर १२/५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे.

SL/KA/SL

14 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *