अर्चना माळवी यांना पीएचडी जाहीर

 अर्चना माळवी यांना पीएचडी जाहीर

ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील गुरूनानक खालसा महाविद्यालय येथील मराठी विभागाच्या अध्यापिका अर्चना संदीप माळवी यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने पीएचडी ही पदवी जाहीर केली आहे.

अर्चना माळवी यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख ( निवृत्त) डॉ. भारती निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘१९४५ नंतरच्या निवडक महानगरीय कथांचा चिकित्सक अभ्यास,’ या विषयावरील मुंबई विद्यापीठास सादर केलेल्या प्रबंधास ही पीएचडी जाहीर करण्यात आली आहे.

अर्चना माळवी या गेली २८ वर्षे गुरूनानक खालसा महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी आपल्या संशोधनासाठी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि भाऊ पाध्ये यांच्या निवडक कथांचा चिकित्सक अभ्यास करून प्रबंध मुंबई विद्यापीठास सादर केला होता. PhD announced to Archana Malvi

ML/KA/PGB
12 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *