ATM मधुन काढता येणार PF चे पैसे

 ATM मधुन काढता येणार PF चे पैसे

मुंबई, दि. २६ : आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) मधील रक्कम थेट ATM मधून काढता येणार आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने दिली आहे. ही सुविधा जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ईपीएफओचे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) लवकरच होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते.

EPFO आणि राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यातील सहकार्यामुळे यासाठी विशेष प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये PF खात्याला युजरच्या आधारशी लिंक करून त्यावर UPI आधारित प्रणालीद्वारे व्यवहार शक्य होणार आहे. यामुळे PF मधील रक्कम बँकेत ट्रान्सफर करण्याची गरज न पडता थेट ATM मधून पैसे काढता येतील.

EPFO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही सुविधा सुरुवातीला निवडक शहरांमध्ये सुरु केली जाईल आणि नंतर देशभरात विस्तार केली जाईल. यासाठी खातेदारांनी आपले PF खाते आधारशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.”

या नव्या योजनेमुळे PF मधील रक्कम मिळवण्यासाठी अर्ज, प्रतीक्षा आणि प्रक्रिया यांचा त्रास कमी होणार आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय खर्च, शिक्षण किंवा इतर गरजांसाठी त्वरित निधी मिळवणे शक्य होईल. EPFO ने यासंदर्भात लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी करणार असून खातेदारांना SMS किंवा ईमेलद्वारे माहिती दिली जाईल. ही सुविधा डिजिटल भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

ईपीएफओने आपल्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. नुकतेच, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सदस्यांना चांगली, पारदर्शक आणि सोपी सेवा देण्यासाठी काही सुधारणा जाहीर केल्या. या सुधारणांचा एक भाग म्हणून 18 सप्टेंबर रोजी ‘पासबुक लाईट’ ही नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे सदस्य आपले पासबुक, त्यात जमा झालेले आणि काढलेले पैसे तसेच शिल्लक रक्कम मेंबर पोर्टलवर सहज पाहू शकतात.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *