ATM मधून काढता येणार PF ची रक्कम

 ATM मधून काढता येणार PF ची रक्कम

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपत्कालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीतून (provident Fund) पैसे काढण्यासाठी तीन दिवस लागतात. मात्र आता पुढील वर्षापासून कोणत्याही ATMमधून PFचे पैसे काढता येणार आहेत. पीएफमधून पैसे काढणे एटीएममधून पैसे काढण्याइतके सोपे होईल. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी पीएफमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतील. आता त्यांच्यावर गुंतवणुकीची मर्यादा राहणार नाही.

ईपीएफओ 3.0 अंतर्गत ग्राहकांना एटीएमद्वारे पीएफमधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल. ही नवीन सेवा मे-जून 2025 पर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे. ईपीएफओचा हा प्रस्ताव सध्या चर्चेच्या प्राथमिक टप्प्यावर आहे. ईपीएफओ 3.0 योजनेच्या अंमलबजावणीनंतर ग्राहकांना निवृत्तीचे चांगले फायदे मिळतील आणि पीएफ व्यवस्थापन पूर्वीपेक्षा सोपे होईल.

ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या बचतीनुसार पीएफ खात्यात अधिक योगदान देण्याचा पर्याय देखील मिळू शकतो. आता कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास ते त्यांच्या पीएफ खात्यात विहित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम कधीही जमा करू शकतात. मात्र, कंपनीचे योगदान पगारावर आधारित राहील, ज्यामुळे प्रणालीची स्थिरता कायम राहील.

SL/ML/SL

30 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *