COVISHIELD चे दुष्परिणाम तपासणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

 COVISHIELD चे दुष्परिणाम तपासणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॲस्ट्राझेनेकाच्या कोविड लसीच्या दुष्परिणामांची तपासणी करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही लस अनेक देशांतील कोट्यवधी लोकांना कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावाने देण्यात आली.यूके फार्मास्युटिकल कंपनीच्या या लसीचा फॉर्म्युला वापरून सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड लस तयार केली होती. कायदेशीर वेबसाइट लाइव्ह लॉनुसार, याचिकेत म्हटले आहे की, एक तज्ज्ञ वैद्यकीय समिती स्थापन करावी, ज्याने लसीचे दुष्परिणाम काय आहेत आणि त्यामुळे किती धोका निर्माण होऊ शकतो याची तपासणी करावी. स्ट्राझेनेकावर त्यांच्या लसीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. इतर अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागले. कंपनीविरुद्ध उच्च न्यायालयात 51 खटले प्रलंबित आहेत. पीडितांनी ॲस्ट्राझेनेकाकडून सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनच्या न्यायालयात कबूल केले की कोविड-19 लसीमुळे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात. तथापि, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्येच घडते.

ब्रिटीश उच्च न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये, कंपनीने मान्य केले आहे की तिच्या कोरोना लसीमुळे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच TTS होऊ शकते. या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

ही ऑक्सफर्ड – ॲस्ट्राजेनेका लस अनेक देशांतील कोट्यवधी लोकांना कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावाने देण्यात आली. मात्र या लसीमुळे थ्राम्बोसायटोपेनिया (टीटीएस) हा आजार होऊ शकतो. या आजारात रक्तात गुठळ्या होतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. या आजारामुळे रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होऊ शकते. ॲस्ट्राजेनेका या कंपनीविरोधात ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने न्यायालयात खटला दाखल केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ॲस्ट्राजेनेका कंपनीने विकसित केलेली लस घेतल्यानंतर स्कॉट यांना मेंदू विकार जडला.

स्कॉट यांच्याप्रमाणे आणखी काही लोकांना लस घेतल्यानंतर आरोग्य विषयक समस्या उद्भवल्या. या लोकांनीदेखील कंपनीच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. ॲस्ट्राजेनेकाच्या लसीमुळे झालेल्या त्रासाबद्दल याचिकाकर्त्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कंपनीने कबूल केले की, या लसीमुळे टीटीएस हा आजार होऊ शकतो. या कबुलीमुळे याचिकाकर्त्यांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. ब्रिटननेही या लशीवर बंदी घातली आहे. आपल्या लशीमुळे ज्या लोकांना काही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागला, त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. यापुढे लस निर्मितीबाबत सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाही कंपनीने न्यायालयात दिली. मात्र त्याचवेळी आपल्या लशीमुळे कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार होण्याबाबत पसरविल्या जात असलेल्या अफवांचे कंपनीच्या वतीने जोरदार खंडण करण्यात आले आहे. लशीमुळे गंभीर आजार होत नाही असे कंपनीने सांगितले.

SL/ML/SL

1 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *