मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात सदावर्तेंची याचिका

मुंबई दि.2( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलना विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात सदावर्ते विरुद्ध मराठा आंदोलक वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
राज्यभरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असताना ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 25 ऑक्टोबर पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोनाविरोधात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.
SW/KA/SL
2 Nov. 2023