पेशावरी बैंगन

 पेशावरी बैंगन

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: 

४५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 

८-१० छोटी वांगी
२ वाट्या कांदा (किसून किंवा बारीक चिरुन)

२ छोटे चमचे तिखट
१ छोटा चमचा धणेपूड
दालचिनी, लवंग, वेलची यांची पूड प्रत्येकी अर्धा चमचा
४ छोटे चमचे खसखस- वाटून
१ छोटा चमचा हळद

१ छोटा चमचा वाटलेला लसूण
१ छोटा चमचा वाटलेले आले

१ वाटी दूध
अर्धी वाटी दही
अर्धी वाटी खवा (मावा पावडर चालेल)
पाव वाटी काजूचे तुकडे (ऐच्छिक)

२ छोटे चमचे साखर
मीठ

१ वाटी तेल
दीड वाटी पाणी

वरुन घालण्यास कोथिंबीर, पुदीना(ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

– एक मोठे भांडे, कढई वा पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल घालून गरम होऊ द्यावे.
– वांगी धुवून, पुसून त्यांना + अशी चीर देऊन ती या तेलात थोडी परतून घ्यावी. बाहेर काढून ठेवावी.
– याच भांड्यात उरलेले तेल घालावे.
– गरम झाल्यावर त्यात २ वाट्या कांदा घालून चांगले परतावे, मग खवा (मावा पावडर) घालून परतावे. खाली लागू देऊ नये.
– यानंतर त्यात हळद, आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, साखर, लवंग-दालचिनी-वेलची पूड घालावी.
– वाटलेली खसखस व काजूचे तुकडे घालून परतावे.
– मग एक वाटी दूध आणि अर्धी वाटी दही(फेटून एकजीव केलेले) घालावे.
– १-२ मिनिटे परतावे.
– नंतर वांगी घालावीत आणि ४-५ मिनिटे परतावे.
– मग यात दीड वाटी गरम पाणी घालून झाकण देऊन वांगी शिजवावी.
– वरुन चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालून वाढावे.
– चपाती, नान, बासमतीचा भात याबरोबर छान लागते. ग्रेव्ही दाटच असते.

PGB/ML/PGB
13 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *