वंदे भारत एक्स्प्रेसचा चित्रपटांच्या शुटींगसाठी वापर करण्यास मंजुरी
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाडीचा चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी वापर करू देण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाने पहिल्यांदाच मंजुरी दिल्याने लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतर काल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर प्रसिद्ध दिग्दर्शक शुजित सरकार यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात वंदे भारत एक्स्प्रेस गाडीचा वापर करण्यात आला. त्यामुळे चित्रिकरणात या गाडीचा वापर करणारे शुजीत सरकार हे बॉलिवूडचे पहिले दिग्दर्शक ठरले आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसचा चित्रिकरणासाठी वापर करू देण्याच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण करताना पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चित्रिकरणासाठी वापरण्यात आलेली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई – अहमदाबाद मार्गावर धावते. मात्र बुधवारी ही गाडी सेवेत नसते. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार बुधवारी ही गाडी चित्रिकरणासाठी वापरण्यास पंरवानगी देण्यात आली. यातून पश्चिम रेल्वे प्रशासनाला २३ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही रक्कम या गाडीच्या एकेरी प्रवासातून मिळणाऱ्या २० लाख रुपयांहून अधिक आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसचा चित्रिकरणासाठी वापर करू देण्याच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण करताना पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चित्रिकरणासाठी वापरण्यात आलेली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई – अहमदाबाद मार्गावर धावते. मात्र बुधवारी ही गाडी सेवेत नसते. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार बुधवारी ही गाडी चित्रिकरणासाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली. यातून पश्चिम रेल्वे प्रशासनाला २३ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही रक्कम या गाडीच्या एकेरी प्रवासातून मिळणाऱ्या २० लाख रुपयांहून अधिक आहे.
SL/ML/SL
9 Jan. 2025