खानदेशातील विशेष गाड्यांमध्ये डब्यांची कायमस्वरूपी वाढ

 खानदेशातील विशेष गाड्यांमध्ये डब्यांची कायमस्वरूपी वाढ

नाशिक, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष गाड्यांना एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे अनुक्रमे दि. १८.५.२०२३ आणि २०.५.२०२३ पासून वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

ट्रेन क्रमांक 02101/02102 आणि ट्रेन क्रमांक 01065/01066 साठी सुधारित संरचना:
एक वातानुकूलित चेअर कार, १ शयनयान , ८ द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन सह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.

संवर्धित शयनयान कोचसाठी बुकिंग दि. १७.५.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल आणि अतिरिक्त ३ सामान्य द्वितीय श्रेणी अनारक्षित कोच म्हणून चालतील आणि UTS द्वारे बुक केले जाऊ शकतात.

प्रवाशांना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.Permanent increase of coaches in special trains in Khandesh

ML/KA/PGB
18 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *