पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील साजरा होणार पादचारी दिवस

 पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील साजरा होणार पादचारी दिवस

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अखंड गडबज असलेला लक्ष्मी रस्ता उद्या थोडीशी उसंत घेणार आहे. पुण्यात उद्या ब पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार लक्ष्मी रोडवर नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक या मार्गावर ‘वाहनमुक्त रस्ता’ घोषित करण्यात आला आहे. या मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिका गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिवस साजरा करते.

यानिमित्ताने उद्या लक्ष्मी रस्ता सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हॅप्पी स्ट्रीटचे खेळ व रस्ता सुरक्षाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता हा आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. हा रस्ता वाहनविरहित करून पथ विभागातर्फे तो सजवलं जाणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर पीएमपीएलकडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे.

SL/ML/SL
10 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *