पर्लकोटा नदी ओसंडून वाहिली , शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला..

 पर्लकोटा नदी ओसंडून वाहिली , शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला..

गडचिरोली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात तीन दिवसापासून सततधार पाऊस येत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत . यातच भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे.Pearlkota river overflowed, more than hundred villages were cut off.

दक्षिण गडचिरोलीत आलापल्ली हे गाव मध्यभागी असलेले शहर असून याच ठिकाणाहून जिल्हाभरात महामार्ग जात असतात, यातच आलापल्ली-भामरागड
महामार्गावर छोट्या मोठ्या पुलांचे नवनिर्माण सुरू आहे आणि या ठिकाणी सततधार पाऊसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पूर्णपणे मार्ग बंद पडला आहे.

इकडे पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्याने शंभर पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सततधार पाऊस होत असल्यामुळे पुन्हा नदी, नाल्या काठावरील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने सतर्क करण्यात आले आले तरी सध्या पाण्याचा जोर कायम आहे.त्यामुळे काही शाळांना सुट्टी ही देण्यात आले आहे..

ML/KA/PGB
18 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *