मोरावर झाले शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार
नेरळ, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य नेरळ गाव आणि परिसरात मोर या देखण्या पक्षाचा मुक्त संचार सुरू असतो. मानवी वस्तीतही मोरांचा वावर सुरक्षीत असल्याने असंख्य मोर अनेक वर्षे वस्ती करून आहेत. १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट टेकडी येथे वाहणार्या कंपनीच्या वीजवाहक तारांना एक मोर धडकून मृत्युमुखी पडला. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने वन्यजीव कायद्यानुसार मोराचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्यात आला.
नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी बाळू लिये आणि नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे कार्यकर्ते किशोर भोईर यांनी त्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळून त्याचे दफन केले.
SL/ML/SL
18 April 2024