पाझर तलाव फुटल्याने शेतपिकं गेली पाण्याखाली
जालना दि १६:– जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील वनकुटा येथील पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतीपिकं पाण्याखाली गेली आहेत. काल घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला असून नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच या मुसळधार पावसामुळे तालुकातील वनकुटा पाझर तलाव देखील फुटला असून तलावातील पाणी परिसरातील शेतांमध्ये घुसल्याने अनेक शेतीपिकं पाण्याखाली गेली आहेत. पिकांचं नुकसान झाल्याकारणाने परिसरातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. दरम्यान, या पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.ML/ML/MS