पेटीएमचं महिलांसाठी खास फिचर
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्यापैकी अनेकजण बसने प्रवास करतात. अनेकदा प्रवासासाठी आपण ऑनलाईन बस देखील बुकिंग करतो. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला त्या बसचं नाव, रेटिंग आणि त्या बसमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत यांची माहिती मिळते. पण, ती बस आपल्यासाठी कितपत सुरक्षित आहे याबाबत आपल्याला माहिती मिळत नाही.
पेटीएम मध्ये महिला अनुकूल प्रवास वैशिष्ट्य
पेटीएमचे हे नवीन फीचर आता दिसायला सुरुवात झाली आहे. पेटीएममधील तिकीट बुकिंग पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला हे फीचर दिसेल. याआधी प्रवास केलेल्या महिलांच्या अनुभवांची संपूर्ण नोंद येथे तुम्हाला पाहायला मिळेल. या अनुभवांच्या आधारे आता कोणतीही महिला स्वत:साठी योग्य बस बुक करू शकणार आहे.
पेटीएम ॲपवर महिलांसाठी ही खास सुविधा देण्यात आली आहे. यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, या बस सुविधेचा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी वेगवेगळे फीचर्स देखील देण्यात आले आहेत आता हे फीचर्स नेमके कसे काम करतात ते पाहूयात.
पेटीएमच्या म्हणण्यानुसार, या चार फीचर्समुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणर आहे.
- बस रेटिंगच्या या पर्यायात महिला आपला बसमधील अनुभवाच्या आधारे बसला रेटिंग देऊ शकतात. यामुळे त्यांच्यासारख्याच ज्या समविचारी महिला आहेत त्यांना प्रवासासाठी आणखी बळ मिळेल.
- या फीचरमध्ये, महिलांनी सर्वात आधी निवडलेल्या बसेस हायलाईट केल्या जातील, जेणेकरून इतर महिलांना चांगल्या बस ऑप्शनची माहिती मिळू शकेल.
- ऑनलाईन बस ऑप्शनमध्ये महिलांच्या आवडी-निवडीवरही भर देण्यात आला आहे. महिला यूजर्सने केलेल्या बुकिंगच्या आधारे, हा पर्याय बहुतेक महिला कोणत्या बस सेवेला प्राधान्य देतात ते कळेल.
- याद्वारे, सर्वात आधी कोणती सेवा निवडली गेली आणि त्यानंतर ड्रॉप केली गेली हे जाणून घेणं शक्य होईल. हे ॲप महिलांना प्रवास करण्यासाठी सोयीस्कर असलेल्या बस प्रकाराची माहिती देईल.
- Paytm’s special feature for women
PGB/ML/PGB
21 March 2024