Paytm ने हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांत Paytm कंपनीने वेगवेगळ्या युनिट्समध्ये टाळेबंदी केली आहे. पेटीएमची मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड’ १ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. Paytm मधील कर्मचारी कपात ही इंडियन न्यू एज टेक फर्मने या वर्षी केलेली सर्वात मोठी कपात असल्याचे मानले जात आहे.
कंपनीने खर्च कमी करण्यासाठी कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले असून कंपनी आता विविध व्यवसायांची पुनर्रचना करत आहे. वन 97 कम्युनिकेशन्सच्या एकूण कर्मचार्यांपैकी किमान 10% वर टाळेबंदीचा परिणाम होईल असा अंदाज आहे.
या कर्मचारी कपातीबाबत कबुली देत कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘Paytm चालू आर्थिक वर्षात 10%-15% कर्मचाऱ्यांच्या खर्चात कपात करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ऑटोमेशनचा समावेश असलेल्या भूमिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होईल. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्याने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत असहमती व्यक्त केली.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरमध्ये पेटीएमचा निव्वळ तोटा जवळपास निम्म्याने कमी होऊन 292 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 571.5 कोटी रुपये होता.
SL/KA/SL
25 Dec. 2023