निवडणूक कामात उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपये द्या
मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क) : नोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 20 में 2024 रोजी मतदानाच्या कामासाठी कर्तव्यावर असलेल्या मनपाच्या तीन कार्मचा-यांचा उष्मघाताने मृत्यू झाला. त्या कार्मचा-यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपये व वारसाला त्वरीत नोकरी द्यावी अशी मागणी रिपाई (आठवले)चे राष्ट्रिय अध्यक्ष रामदासजी आठवले (केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार) “म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश कमलाकर जाधव यांनी केली आहे.
कोरोना महामारी साथीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या मनपाच्या कार्मचा-यांचा मृत्यू झाला. त्या कार्मचा-यांच्या कुटूंबांना 50 लाख रुपये देण्यात आले.
त्यांच्या कुटुंबातील एका वारसाला त्यांच्या शैक्षणीक पात्रतेप्रमाणे दोन महिण्याच्या कालावधीत त्वरीत नोकरी देण्यात आली.
त्याच प्रमाणे देशसेवेच्या कार्यासाठी 2024 लोकसभा निवडणूक कामासाठी कर्तव्यावर असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका कार्मचा-यांचा उष्मघाताने मतदानाच्या दिवशी 20 में 2024 रोजी तीन कार्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटूंबांना 50 लाख रुपये देण्यात यावेत व त्यांच्या कुटूंबातील एका वारसाला त्याच्या शैक्षणीक पात्रतेप्रमाणे दोन महिण्याच्या कालावधीत त्वरीत नोकरी देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश कमलाकर जाधव व पदाधिकारी, यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे 22 मे रोजी एम.एम.एस. पत्र क्र. 55 च्या पत्राद्वारे केली आहे.
SW/ML/SL
23 May 2024