पवारांचा निर्णय ही पक्षांतर्गत बाब

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरु आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी आपण त्यावर बोलू. मी अजून शरद पवार यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणार नाही असे फडणवीस म्हणाले.Pawar’s decision is an internal party matter
मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, ते योग्य वेळी लिहिणार आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे आणि सत्य काय आहे, हे मी त्यात मांडीन आणि मग सकाळच्या शपथविधी बाबत अधिकचे सत्य समोर येईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/PGB
2 May 2023