अहमदाबाद विमान अपघातात आश्चर्यकारकपणे वाचला एक प्रवासी

 अहमदाबाद विमान अपघातात आश्चर्यकारकपणे वाचला एक प्रवासी

अहमदाबाद, दि. १२ : अहमदाबाद येथे आज झालेल्या AIR India विमानाच्या भीषण अपघातात विमानातील सर्व २४२ प्रवासी मृत पावल्याची भीती व्यक्त होत होती मात्र यातून एक व्यक्ती वाचल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. यामुळे विमानातील अजून काही लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने सुरू आहे.

या अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वकुमारने नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती दिली. आमच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदांत एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. मी जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा माझ्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडले होते. मी खूप घाबरलो होतो. मी उभा राहिलो. सैरावैरा पळू लागलो. माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे विखुरले होते. मला कोणीतरी पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.” असे रमेश विश्वकुमार यांनी सांगितले.

रमेश विश्वकुमार हे ब्रिटीश नागरिक आहेत. ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते. त्यांचा भाऊ अजय कुमार यांच्यासोबत ते युकेला परतत होते. त्यावेळी हा विमान अपघात झाला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *