३३% मिळवून व्हा उत्तीर्ण, या राज्यात नवीन नियम

बंगळुरु, दि. १६ : शिक्षण हा संविधानाच्या राज्यसूचीतील निर्णय असल्याने प्रत्येक राज्य शिक्षणाबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. राज्ये आपापल्या विद्यार्थ्यांच्या आवश्यकते नुसार धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठ एक महत्त्वाचा निर्णय आपल्या शेजारील राज्यात घेण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये यापुढे दहावी आणि बारावी परीक्षेत केवळ ३३ टक्के गुण मिळाले तरी संबंधित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण म्हणून गृहीत धरले जाणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली.शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी आणि शिक्षणात सुलभता सुधारण्यासाठी एक पाऊल असल्याचे हे बंगारप्पा म्हणाले.
२०२५-२६ सालापासून (2025–26 academic year)होणार असून यंदा परीक्षेला हजर होणाऱ्या रिपीटर, ब:हिस्थ विद्यार्थ्यांनाही हा नियम लागू असणार आहे, असेही शिक्षणमंत्री बंगारप्पा म्हणाले. त्यांनी सांगितले की, दहावी वार्षिक परीक्षेत ६२५ पैकी २०६ गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण ठरणार आहेत.
तर बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी ६०० पैकी १९८ गुण पुरेसे आहेत. अंतर्गत गुण आणि वार्षिक परीक्षेतील गुण मिळून ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा म्हणून ३ परीक्षा व्यवस्था जारी करण्यात आली आहे. परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी वेब कास्टिंग केले जात आहे.
SL/ML/SL 16 Oct. 2025