EC कडून निवडणूक रोख्यांची पक्षनिहाय संख्या जाहीर

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक रोख्यांवरून गेल्या काही दिवसांपासून देशभर निर्माण झालेल्या गदारोळाच्या स्थितीवर आज अखेर निवडणूक आयोगाकडून स्पष्टता देण्यात आली आहे. निवडणूक रोख्यांची पक्षनिहाय संख्या निवडणूक आयोगाने आज (रविवार) जाहीर केली आहे. या यादीत भाजपने निवडणूक रोखे वटवत 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. तर 2019-20 या काळामध्ये तब्बल 2 हजार 555 कोटींची कमाई भाजपने केली आहे, असं स्पष्ट झालं आहे. रोखे वटवत कमाई करण्यामध्ये भाजप एक नंबर तर तृणमूल काँग्रेसचा दुसरा क्रमांक लागतो. काँग्रेस तिसऱ्या नंबरवर आहे. काँग्रेसने 1335 कोटींची कमाई केली आहे. , सीपीआय(एम), एआयएमआयएम, बसपा यांनी सांगितले की त्यांना निवडणूक रोख्यांद्वारे कोणताही निधी मिळाला नाही.
पक्षनिहाय रोख्यांची संख्या
- भाजप – 6 हजार 986.5 कोटी
- तृणमूल काँग्रेस -1397 कोटी रुपये
- काँग्रेस – 1,334.35 कोटी
- डीएमके – 656.5 कोटी
- बिजू जनता दल – 944.5 कोटी
- वायएसआर काँग्रेस – 442.2 कोटी
- तेलगू देसम 181.35 कोटी
- बीआरएस 1322 कोटी
- सपा 14.05 कोटी
- अकाली दल 7.26 कोटी
- AIADMK – 6.05 कोटी
- नॅशनल काँन्फनन्स – 50 लाख
निवडणूक आयोगाने सांगितले की, राजकीय पक्षांकडून मिळालेला डेटा सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. 15 मार्च 2024 रोजीच्या न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाही करून न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सीलबंद लिफाफ्यात पेन ड्राइव्हमधील डिजिटल रेकॉर्डसह प्रती परत केल्या. आयोगाने आज त्यांच्या वेबसाइटवर निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून डिजिटल स्वरूपात प्राप्त केलेला डेटा अपलोड केला आहे.
याआधी गुरुवारी निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांशी संबंधित तपशील आपल्या वेबसाइटवर पोस्ट केला होता. 15 फेब्रुवारी रोजी आपल्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना असंवैधानिक ठरवून ती रद्द केली होती. निवडणूक रोखे योजना 2 जानेवारी 2018 रोजी सुरू करण्यात आली. या रोख्यांची पहिली विक्री मार्च 2018 मध्ये झाली.
SL/ML/SL
17 March 2024