मराठा आरक्षणावर चर्चा न करता सरकार पळ काढतेय

 मराठा आरक्षणावर चर्चा न करता सरकार पळ काढतेय

पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतःची कातडी वाचविण्यासाठी मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनताने दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा न करता कामकाज चालवायचं नाही ही सत्ताधाऱ्यांची भूमिका चुकीची आहे. सभागृह तहकूब केल्यामुळे विरोधी पक्षांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा देत निषेध नोंदवला. सरकारने दोन्ही घटकांशी चर्चा करायला हवी होती. मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही माहिती विरोधी पक्षाला सरकारने दिली नाही.

अडचणीचा विषय येताच सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली. एकप्रकारे सरकार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पळ काढतेय. नवी मुंबईत मराठा समाज आला होता त्यावेळी मुख्यमंत्री एकटे का गेले असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. Party leader Ambadas Danve

ML/ML/PGB
10 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *