परतूर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, शेतीपिकं पाण्याखाली…

जालना दि २२:– जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. यामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतीपिकं पाण्याखाली गेली असून शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. परतूर तालुक्यात काल सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांना पूर आला असून विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. दरम्यान, तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर झाली आहे. मात्र, या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याने Sanjna चिंतेत पडले आहेत. ML/ML/MS