परतूर तालुक्यात यंदा टरबूज लगवडीच्या क्षेत्रात वाढ…

 परतूर तालुक्यात यंदा टरबूज लगवडीच्या क्षेत्रात वाढ…

जालना, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्याच्या परतूर तालुक्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टरबूज लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झालीय. मात्र, यंदा मधमाश्यांचा अभाव दिसत असल्याने टरबूजाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. परतूर तालुक्यात मागील वर्षी 52 हेक्टरवर टरबूजची लागवड करण्यात आली होती. यंदा हे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहे.

टरबुजाच्या फळधारणेसाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, यंदा या मधमाश्या दिशेनाशा झाल्या आहेत. या मधमाश्यांचे प्रमाण घटल्याने यंदा टरबुजाच्या वेलींना फळ लागण्याचे प्रमाण कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या समस्येबाबत कृषी विभागाने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

ML/ML/PGB
9 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *