थेट आकाशात जोडले जाणार चांद्रयान 4 स्पेसक्राफ्टचे पार्ट

 थेट आकाशात जोडले जाणार चांद्रयान 4 स्पेसक्राफ्टचे पार्ट

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेनंतर आता भारतीय शास्त्रज्ञ चांद्रयान 4 विकसीत करण्यासाठी सज्ज झाले आहे.चांद्रयान 3 पेक्षा चांद्रयान 4 ही मोहिम अत्यंत वेगळी असणार आहे. चांद्रयान 4 स्पेसक्राफ्टचे पार्ट हे थेट आकाशात जोडले जाणार आहेत. भारताची नवी टेन्कॉलीजी पाहून संपूर्ण जग स्तिमीत होणार आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी मिशन चांद्रयान 4 बाबत माहिती दिली. चांद्रयान 4 इस्रो पहिल्यांदाच असा प्रयोग करणार जो जगभरात यापूर्वी कधीही झालेला नाही असे सोमनाथ यांनी सांगितले.

चांद्रयान 3 प्रमाणे चांद्रयान 4 हे एकावेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार आहे. चांद्रयान 4 हे दोनदा प्रक्षेपित केले जाणार आहे. म्हणजेच चांद्रयान 4 चे दोनदा लाँचिग केले जाणार आहे. दोनवेळा वेगवगेवळे पार्ट अवकाशात प्रक्षेपित केले जातील. चांद्रयान 4 चे स्पेसक्राफ्टचे पार्ट हे आकाशात किंवा लँडिगवेळी चंद्रावरच एकमेकांना जोडले जातील. जगात प्रथमच मून मिशनसाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञाचा वापर केला जात आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारा भारत हा पहिला देश आहे.

14 जुलै 2023 रोजी चंद्राकडे झेपावलेले चांद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर लँड झाले. तब्बल 14 दिवस चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने गोळा केला आहे.

SL/ML/SL

27 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *